मोहोळच्या माजी आमदाराचे बंड थंडावण्याची शक्यता


मोहोळ तालुक्याचे माजी  राजन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे राष्ट्रवादी पक्ष सोडणार असल्याच्या वावड्या गेल्या अनेक दिवसापासून उठत होत्या. मात्र आज महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे हे बंड थंडावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बळीराम काका साठे यांचा शब्द प्रमाण मानला जाईल तर मोहोळ विधानसभेची संपूर्ण जबाबदारी ही केवळ माजी आमदार राजन पाटील यांच्याकडे असेल असे या बैठकीत ठरल्याचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी फेसबुकच्या पोस्टद्वारे सांगितले आहे. त्यामुळेे आता माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादीतच राहतील अशी शक्यता आहे

Post a Comment

0 Comments