संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, ‘त्या’ आश्वासनाची करून दिली आठवणस्वराज्य संघटनेच्या स्थापनेनंतर संभाजीराजेंनी मराठी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजीराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहित त्यांच्याच आश्वासनाची आठवण करून दिली आहे.

शासकीय सेवेत निवड होऊनही नियुक्ती न मिळालेल्या सरसकट सगळ्या मराठा उमेदवारांना मानवतेच्या दृष्टीकोनातून अधिसंख्य जागा निर्माण करून त्यांची ज्या पदांवर निवड झाली आहे त्याच पदांवर नियुक्ती देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करू, असं आश्वासन आपण दिले होते. त्याची तात्काळ पूर्तता करावी, अशी मागणी संभाजीराजेंनी पत्र लिहित केली आहे.

संभाजीराजेंच्या या पत्रानंतर आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

 

Post a Comment

0 Comments