भाजपने साम-दाम-दंड-भेद वापरून विविध राज्यात सत्ता स्थापन केली आहे. ईडीसारख्या केंद्रिय यंत्रणांना हाताशी धरून ऑपरेशन लोटस साध्य केले असल्याचा आरोप शिवसेनेने मोदींवर केला आहे. तसेच 'ऑपरेशन लोटस' म्हणजे 'कमळ' हा अल-कायदाप्रमाणेच विरोधकांसाठी दहशतीचा शब्द बनला असल्याचे म्हटले आहे आता यावरून वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत.
महाराष्ट्रात ईडीच्या धाकाने एकनाथ शिंदेंचे बंड उभे राहिले. बिहारमध्ये देखिल यांनी असाच धाक दाखवून सत्ता स्थापन केली होती. दक्षिणेकडील राज्या भाजप समोर नतमस्तक व्हायला तयार नाहीत हे पचवायला खूप जड जाते. दिल्लीतही 'ऑपरेशन लोटस'च्या नावाखाली सीबीआयला नेत्यांच्या मागे लावले आहे. मोठमोठ्या ऑफर दिल्या जात असल्याचा आरोप भाजपवर केला आहे.
0 Comments