सोलापूर बार्शी रोडवरील खेडपाटी जवळील कॅनॉल मध्ये युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याच ठिकाणी एक दुचाकी दिसून येत आहे.
रविवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी साधारण सव्वाआठच्या दरम्यान खेड पाटी जवळील टोलनाक्या परिसरात एक युवक आणि त्याची गाडी कॅनॉल मध्ये पडलेली आढळून आली. सदर व्यक्ती मृतावस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. साधारण काळा शर्ट आणि जीन पॅन्ट असलेली व्यक्ती कॅनॉलमध्ये पालथी पडलेल्या अवस्थेमध्ये आहे तर एक दुचाकीपण याच ठिकाणी पडलेली आहे.
एच एच १३ ए टी ९७०७ दुचाकी घटनास्थळी दिसून येत आहे. गाडीसह युवक कॅनॉलमध्ये पडल्याने प्रथमदर्शनी हा अपघात वाटत आहे. या भागातील पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून परिसरातील नागरिक आणि या रस्त्याने जाणारे वाहनधारकांची गर्दी जमलेली आहे.
0 Comments