गुप्तांगाला चेंडू लागल्याने पंढरपुरातील ३५ वर्षीय तरुणांचा मृत्यू


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये क्रिकेट खेळणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे.

क्रिकेट खेळत असताना या तरुणाच्या गुप्तांगाला बॉल लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील क्रिकेटच्या मैदानामध्ये घडली आहे. विक्रम गणेश क्षीरसागर (वय ३५) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे मैदानात क्रिकट  खेळत असताना गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने विक्रमच्या गुप्तांगाला जोरदार फटका लागला. यानंतर विक्रम मैदानावर खाली कोसळला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालायात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारा दरम्यानच विक्रमचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे क्रिकेट विश्वास शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments