माढा! लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामसेवकावर लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई


माढा/प्रतिनिधी:

माढा तालुक्यातील उजनी(मा) पंचायत समिती कुर्डुवाडी, ता. माढा येथील  ग्रामसेवकास साडे आठ हजाराची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. हणुमंत उध्दव कदम, वय ४४ वर्षे, पद-ग्रामसेवक असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

यातील तक्रारदार याचे मित्र हे कंत्राटदार असुन त्यांचे मित्रानी मौजे उजनी (मा.), ता. माढा येथे शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगांतर्गत पालखी मार्गातील रस्त्याच्या केलेल्या सिमेंट कॉक्रेटीकरणाच्या कामाचे बिला संदर्भात तक्रारदार पाठपुरावा करीत होते. सदर कामाच्या बिलाची रक्कम खात्यात जमा केली बाबत आलोसे याने तक्रारदार यांच्याकडे एकूण बिलाच्या ३ टक्के प्रमाणे ८४००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्याने आलोसे यास ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, पोलीस अंमलदार प्रमोद पकाले, उमेश पवार, सलीम मुल्ला, सर्व ने. अॅन्टी करप्शन ब्युरो यांनी केली.

Post a Comment

0 Comments