धक्कादायक! लिंगायत संताचा दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार


कर्नाटकातील लिंगायत समाजाचे प्रख्यात संत शिवमूर्ती मुरुगा यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संत शिवमूर्ती यांनी त्यांच्या मठाद्वारे चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहातील दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

एका स्वयंसेवी संस्थेने याबद्दल गंभीर आरोप करताना, मागील अनेक दिवसांपासून पीडित मुलींचे लैंगिक शोषण केले जात होते, असे म्हटले आहे. पीडित मुलींच्या जबाबानंतर संत शिवमूर्ती मुरुगा यांच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर शिवमुर्ती यांना अटक आणि सुटका झाली. मात्र,.पोलिसांनी आरोपी संत शिवमूर्ती मुरुगा यांच्यावर कठोर कारवाई करावी, यासाठी कर्नाटकातील चित्रदुर्गा येथे निदर्शने सुरू झाली आहेत.

Post a Comment

0 Comments