पेठ वडगांव/धनंजय खराडे:
पेठ वडगांव मध्ये स्वकुळ साळी समाज यांचा वतीने अध्यवस्त्र निर्माता भगवान श्री जिव्हेश्वर पालखी सोहळा अत्यंत आनंद उत्सवात आणि धार्मिक पद्धतीने साजरा झाला. श्री भगवान जिव्हेश्वर या देवतेचा जन्म भगवान शंकर यांच्या जिव्हेपासून (जिभेपासून) झाला आहे, अशी श्रद्धा आहे. जिव्हेश्वर हे साळी (महाराष्ट्रातील विणकर) समाजाचे कुलदैवत असते. कोरोणा कालखंडाचा दोन वर्षानंतर पालखी सोहळा सर्व समाज बांधवांचे उपस्थितीत अत्यंत धार्मिक पद्धतीने साजरा झाला.
श्री भगवान जिव्हेश्वर यांच्या पालखी सोहळा मुळे समाजामध्ये तसेच गावामध्ये भक्तिमय वातावरण झाले.
तसेच समाजाने रक्तदान शिबीर चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सध्या भासत असलेल्या रक्ततुटवडा पाहता रक्तदान हा उपक्रम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जपत समाजाने समाजसेवेचा उपक्रम राबविला त्यावेळी उपस्थित मान्यवर समाजाचे सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments