परांडा! कपिलापुरी ग्रामपंचायतच्या वतीने विविध उपक्रम


परंडा/प्रतिनिधी;

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती  व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय कपिलापुरी यांच्या वतीने गावकऱ्यांना झाडे वाटप तसेच जि प प्रा शाळा कपिलापुरीच्या विद्यार्थी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि प प्रा शाळेचे शिक्षक कुलकर्णी यांनी केले. गावचे सरपंच वैभव आवाने, उपसरपंच विलास भोसले,रंजितकुमार जैन,सहयाद्री सत्ता साप्ताहिकचे कार्यकारी संपादक तथा श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील,
ग्रा.ऑपरेटर नितीन शिंदे, बापू शिंदे,कांतीलाल माने इ. हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी फुलचंद देवळकर,जयघोष आवाने,गजानन आवाने,कुमार उपाध्ये, अविनाश शिंदे,नागनाथ भोसले,नवनाथ शिंदे, शिवाजी जाधव,शत्रघ्न जाधव,ग्रामपंचायत कर्मचारी बाहुबली मसलकर,शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments