‘मी माझी ब्रा…’, Alia Bhatt च्या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळसध्या प्रेग्नेंसी आणि आगामी सिनेमांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री आलिया भट्ट अनेक मुद्द्यांवर स्वतःचं परखड मत मांडताना दिसते. एका मुलाखती दरम्यान आलियाने सोशल मीडियावर येणाऱ्या अभद्र आणि आपत्तीजनक कमेंटबद्दल मत मांडलं आहे. सोशल मीडियावर महिलांवर ज्या प्रकारे कमेंट करण्यात येतात यावर आलिया उघडपणे बोलली आहे. महिलांना समाजात अनेक चुकीच्या गोष्टींचा सामना करावा लगातो.  एवढंच नाही तर, इंडस्ट्रीमध्ये देखील अभिनेत्रींनी सेक्सिज्मचा सामना करावा लागतो.

यावर आलिया म्हणाला, ‘जेव्हा मला माझी ब्रा लपवायला सांगितलं जातं तेव्हा मला प्रचंड राग येतो. ब्रा लपवायची तरी का? ते सुद्धा एक कापड आहे. पुरुषांना त्यांचे अंडरगार्मेंट लपवण्यासाठी कधीही सांगितलं जात नाही….’ पुढे आलिया तिला आलेल्या आपत्तीजनक कमेंटबद्दल बोलली.


‘मी देखील आपत्तीजनक कमेंटचा सामना केला. तेव्हा मी काहीही बोलली नाही. अनेकदा माझे मित्र मला सांगतात एवढी भावुक होऊ नको.’ पुढे आलिया पीरियड्सबद्दल देखील बोलली.

‘महिलांना पीरियड्स होतात म्हणून तुमचा जन्म होतो…’ असं देखील आलिया म्हणाली. सध्या आलियाने मांडलेल्या स्पष्ट मताची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान आलिया सध्या ‘डार्लिंग्स’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

‘डार्लिंग्स’ सिनेमा 5 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आलियाने सांगितले की, तिचा सिनेमा  महिलांच्या वेदना आणि समाजात महिलांना  दबावाखाली जगावं लागत आहे… इत्यादी गोष्टीं भोवती फिरताना दिसणार आहे.

Post a Comment

0 Comments