अक्कलकोट! गावकरी पाठलाग करत आहेत म्हणून चोराने मारली विहिरीत उडी; 18 तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश


अक्कलकोट/प्रतिनिधी:

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करताना ग्रामस्थांच्या पाटलागीत पळून जाताना चोराचा विहिरीत उडी मारली होती 18 तासाच्या प्रदीर्घ शर्यतीनंतर विहिरीतील चोरट्याचा मृतदेह काढण्यास पोलीस प्रशासनाने ग्रामस्थाला यश आला आहे

अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गावात धुमाकूळ घातला गावातील राहुल बगले आणि दादाराव चव्हाण यांची घराची दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि घरातील रोख रक्कमासह दागिने घेऊन बाहेर चोर जात असताना गावातील युवक कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागली तात्काळ गावातील युवक चोराचा पाठलाग सुरू केला चोराचा आणि युवकातील चकमक बराच काळ सुरू होता युवक कार्यकर्त्यांनी चोराचा पाठलाग सुरूच ठेवला  चोर युवक कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटावयासाठी वाटेल ते मार्ग निवडून तो पळू लागला या पळापळीत चोरट्याने रस्ता समजून गावातील पाटील यांच्या विहिरीतच उडी मारली. तात्काळ गावातील युवकांनी पोलिसांशी संपर्क साधला तोपर्यंत चोरट्याला विहिरीतच  जीव गमवावा लागला .

ही घटना कळताच दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब काकडे उपनिरीक्षक प्रवीण लोकरे पोलीस नाईक मल्लिकार्जुन गोटे, पांढरे आदींनी घटनास्थळी दाखल झाले.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते पोलीस उपाधीक्षक राजेंद्र गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक यांनी कारवाई पार पाडली.

दरम्यान गावातील युवक कार्यकर्त्यांची ग्रामस्थांकडून माहिती घेतल्यानंतर मदत कार्याला सुरुवात झाली. विहिरीतील मूर्तध्येह.काढण्यासाठी जीवरक्षकांना बोलवण्यात आली . दोन मोटारी च्या साह्यानं विहिरीतील पाणी काढण्यात आली त्यानंतर
जीवरक्षकाना बोलवण्यात आली होती जीव रक्षक मल्लिकार्जुन धुळखेडे श्रीकांत बनसोडे प्रवीण जेऊरे तेजस मेत्रे महेश रेवणे व इतर सहकारी ग्रामस्थ पोलीस प्रशासनाच्या मदतीने अखेर 18 तासाच्या प्रदीर्घ शर्यतीनंतर पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थाला मृतदेह बाहेर काढण्यास यश आला.

दरम्यान मृतदेह बाहेर काढल्यानंतर शववेचनासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर गावकरी ठाण मांडून होते पोलीस प्रशासनाला मदतीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसून येत होते, दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याकडून घडलेला घटनेसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते राजकुमार वाघमारे यांनी अधिक माहिती दिली. दरम्यान या घटने संदर्भात अधिक माहिती देताना घडलेला घटना आणि पार्श्वभूमी यासंदर्भात पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी  सांगितलं.

दरम्यान दिवसभरात पोलीस प्रशासनाच्या मदतीला गावचे पोलीस पाटील माजी सरपंच सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सहकार्य केलं

Post a Comment

0 Comments