वेट अँड वॉच; राजभवनातला फोटो शेअर करत राऊतांचं सूचक ट्वीट


राज्यात अपात्रतेचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना दुसरीकडे राज्यात मंत्रीमंडळ विस्तार अजूनही रखडलेला आहे. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.

आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, ““उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिआ तो कब्र पर भी जल रहा है!” यासोबत सगळ्यात शेवटी “वेट अँड वॉच” असंही म्हटलं आहे. बहुमताचं पत्र राज्यपालांना देत असताना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि इतर भाजपा नेत्यांचा फोटोही त्यांनी ट्वीट केला आहे.

तर राज्यातल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी काल राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. “बार्बाडोसची लोकसंख्या अवघी अडीच लाख आहे, पण तरीही त्यांच्या मंत्रिमंडळात २७ मंत्री आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी असूनही इथे २ मंत्री हवे तसे निर्णय घेत आहेत. इथे राज्यघटनेचं पालन होतंय का? जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय यासंदर्भात निर्णय देत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी”, अशी मागणी त्यांनी ट्वीटमधून केली होती.

Post a Comment

0 Comments