पोलीस उपनिरीक्षकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार


सरप्राईज देण्याच्या बहाण्याने पोलीस उपनिरीक्षकाने नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलीला चिखलदरा येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित उपनिरीक्षकाला अटक केली आहे. प्रदीपकुमार श्रीकृष्ण नितवने (३५ फ्रेंड्स कॉलनी, गिट्टी खदान) असे अटक केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. 

प्रदीप सिव्हिल लाईन्स येथील गडचिरोलीच्या डीआयजी कार्यालयात तैनात आहे. पीडित १७ वर्षीय मुलगी १२ वीची विद्यार्थिनी आहे. ती सावनेरची रहिवासी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप विद्यार्थिनीचा नातेवाईक आहे. विद्यार्थिनी पेइंग गेस्ट म्हणून सीताबर्डी परिसरात राहते. ती एकटीच असल्यामुळे तिच्या आई वडिलांनी प्रदीपला तिच्याकडे लक्ष देण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्याचे तिच्या घरी येणे-जाणे होते. १३ जुलैला प्रदीपने कुटुंबीयांना मित्रांसोबत चिखलदराला जात असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments