अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम, वैराग मध्ये एकास पोलिस कोठडी


बार्शी तालुक्यातील एका गावामध्ये अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेमातून विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन तरुणांविरोधात छेडछाड, दमदाटीसह बाललैंगिक कायद्यार्तंगत वैराग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका तरुणास पोलिसांनी अटक करून बार्शी सत्र न्यायलायात उभे केले असता त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. बार्शी तालुक्यातील एका गावामध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलीस एक तरुण एकतर्फी प्रेमातून चिठ्ठी देऊन लग्न करण्याविषयी दमदाटी करीत होता. दरम्यान, रात्री दहाच्या सुमारास संबंधित तरुणाने मुलीस घराबाहेर जबरदस्तीने बोलून तिचा विनयभंग केला.

Post a Comment

0 Comments