“तुम्ही शिंदेना सोडा, मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्यासोबत येतो.” अशी ऑफर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना आता भाजपसोबत जाणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. वृत्तवाहिनीच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन करत ही ऑफर दिली होती अशी माहिती समोर येत आहे. नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधी उद्धव ठाकरे यांनी फडवीसांना फोन केला होता आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हा, शिंदे यांना बाजूला ठेवा, मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतो असं उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले होते अशी माहिती समोर आली आहे.
0 Comments