"नागा चैत्यन्यसोबतच्या घटस्फोटावर समंथा स्पष्टच बोलली".. नाहीतर आम्ही एकमेकांचा जीवच घेतला असता



कॉफी विथ करणचा  सातवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा  आणि अभिनेता अक्षय कुमारने हजेरी लावली. यावेळी समंथाने तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.

समंथा तिच्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाबद्दलही शोमध्ये स्पष्ट बोलली. ती म्हणाली, अजूनही आमच्यातील वैर तसेच आहे. घटस्फोट होऊनही आमच्यात मैत्री होऊ शकली नाही. आम्ही जर एकाच घरात राहत असतो तर घरातील सगळ्या धारदार वस्तू लपवून ठेवाव्या लागल्या असत्या. अन्यथा नागा चैतन्य आणि मी एकमेकांचा जीवही घेऊ शकतो. यावरुन त्या दोघात अजूनही बिनसलेलं आहे हे लक्षात येतं.

दरम्यान, समंथा म्हणाली मी पूर्वीपेक्षा खंबीर झाले आहे. या सर्वातून बाहेर पडले आहे. घटस्फोटाचा मार्ग मी स्वत: निवडला आहे. मला चाहत्यांसोबत मनमोकळेपणाने राहायचं आहे. मी एक अभिनेत्री म्हणून माझ्या आयुष्यात चाहत्यांचे खूप योगदान आहे.त्यामुळे चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची माझी जबाबदारी आहे. आम्ही दोघे वेगळे झालो यापेक्षा दु:खद काहीच नाही, असेही समंथा करणने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत म्हणाली.

Post a Comment

0 Comments