बार्शी! अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निर्मूलन न्यास बार्शी तालुक्याची कार्यकारणी जाहीर

बार्शी /प्रतिनिधी : 
        
आज दिनांक 04/07/2022 बार्शी येतील सावळे अण्णा सभागृह बार्शी येथे झालेल्या बैठकीमध्ये बार्शी येथील नवनियुक्त झालेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
       
एका बाजूला गांधीजीच्या स्वप्नातील बलशाली भारताच स्वप्न साकार करण्यासाठी खेडयांचा विकास आणि दुसऱ्या बाजूला गाव समाज आणि देशाच्या विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची गळती रोखणे ही उदिष्टये घेऊन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे कार्य गेली अनेक वर्षे सुरु अआहे.जेष्ठ समाज शेवक पद्यीभूषण आण्णासाहेब हजारे आणि विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला आळा घाण्यासाठी आणि व्यवस्था परिवर्तनासाठी कार्यकरते काम करत आहेत . या माध्यमातून सरकारला दहां कायदे करायला भाग पाडले . यातूनच माहिताचा अधिकार , दप्तर दिरगाई , बदल्याचा कायदा , ग्रामरक्षक दल , लोकपाल यासारखे व्यवस्था परिवर्तन घडवून आणणारे कायदे झाले . लोक निर्भय झाले सनदशीर मार्गाने संघर्ष करणारे अनेक कार्यकरते तयार झाले . महाराष्ट्रातील ३६ जिल्हातील २४२ तालुक्यात समविचारी कार्यकरायाचे संघटन झाल्यामुळे सरकारचे नाक दाबले तर तोड उघडेल अशी आवस्था निर्माण झाली . मागील काळात काही अडचणीमुळे राज्यातील सर्व समीक्षा बरखास्त करण्यात आल्या होत्या . आता कार्यकरत्यांच्या आग्रहानुसार पुन्हा नव्याने संघटन बांधणी करण्याचा निर्णय न्यासाने घेतला आहे . त्यानुसार आपल्या सोलापूर जिल्हातील प्रत्येक तालुक्यात संघटन बांधणीचे काम सुरु आहे . या कामासाठी विश्वस्त मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार बार्शी येथे घेल्यात आलेल्या बैठकीत सर्वांना नियुक्ती देण्यात आल्या आहे . 
         
अध्यक्ष म्हणून दयानंद पिंगळे ,उपाध्यक्ष सचिन गायकवाड, सचिव प्रमोद चौधरी, सहसचिव रामचंद्र कुरुळे ,खजिनदार दत्तात्रय पाटील, सदस्य समाधान चव्हाण ,सदस्य आकाश दळवी ,सदस्य संतोष कळमकर तर बार्शी शहर महिला कमिटी मध्ये अध्यक्ष पदी सुनीता गायकवाड उपाध्यक्ष चंद्रकला बोरगावकर,सचिव रागिणी झेंडे,सहसचिव अनुसया पवार,खजिनदार राजश्री मराठे,सदस्य अशादेवी स्वामी,सदस्य रेखा सुरवसे यांची निवड करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments