गोव्यातील त्या बारपासून १० किमीवर स्मृती इराणींचे आलिशान घर; काँग्रेसने पुरावाच दाखविला


केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचा अवैध  बार असल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसने आणखी एक आरोप केला आहे. त्या बारपासून दहा किमी अंतरावर गोव्यात स्मृती इराणींच्या नावे अलिशान घर असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. कोर्जुए गावात हे घर असल्याचा दावा करण्यात आला आहे.

एका ट्विटमध्ये दावा केला आहे. यामध्ये दोन फोटो ट्विट करण्यात आले असून त्यापैक एकात जुबिन इरानी हे नाव दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ६५ लाख रुपयांचा उल्लेख आणि घराचा पत्ता दिसत आहे.

काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी स्मृती इराणींची लेक झोईश इराणी ही मृत माणसाच्या नावावर लाय़सन घेऊन गोव्यात बार रेस्टॉरंट चालवित असल्याचा आरोप केला आहे. तसेच यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे इराणी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

यावर स्मृती इराणी यांनी प्रत्यूत्तर देताना सोनिया आणि राहुल गांधींच्या ५,००० कोटींच्या लूटप्रकरणी तिच्या आईने पत्रकार परिषद घेतली, ही माझ्या मुलीची चूक आहे. मी राहुल गांधींना २०२४ मध्ये पुन्हा अमेठी लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे आव्हान देते, मी वचन देते की ते पुन्हा पराभूत होतील. माझी १८ वर्षांची मुलगी प्रथम वर्षात महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे आणि कोणताही बार चालवत नाही, असे म्हणाल्या.

आणखी एका ट्विटमध्ये आयएनसी टीव्हीने एकस्क्रीनशॉट शेयर करत स्मृती इराणींची मुलगी झोईश इराणीने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केल्याचे म्हटले आहे. या अकाऊंटवर त्या गोव्यातील बारशी संबंधीत अनेक फोटो होते असे म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments