बिपाशा बसूनं दिली गुड न्यूज, आई होणार?


बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूने चाहत्यासाठी एक गुड न्यूज दिली आहे. करण सिंह ग्रोवर यांची पत्नी बिपाशा बसू लवकरच आई होणार  असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर याविषयी चर्चांना उधाण आलं आहे. अद्या दोघांनीही याबाबतचा कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. परंतु, लवकरच याघटनेची माहिती मिळणार असल्याचे वृत्त आहे.

अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण ग्रोवर दोघेजण २०१६ मध्ये विवाह बंधनात अडकले. सध्या दोघांच्या लग्नाला जवळपास ६ वर्ष उलटले आहेत. यानंतर पहिल्यांदाच बिपाशा बसू आई होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली आहे.

याच दरम्यान बिपाशा आणि करणने दोघांनी याबाबत अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, लवकरच दोघेजण याबाबतची घोषणा सोशल मीडियावर करतील असा अंदाज लावला जात आहे. यानंतर बिपाशा आणि करण ६ वर्षानंतर पालक बनणार असल्याने चाहत्याच्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

बिपाशा बसू आणि करण दोघेजण नेहमी त्याचे रोमॉन्टिक, हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. करण आणि बिपाशा या दोघांची पहिली भेट दिग्दर्शक भूषण पटेल यांच्या ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर झाली. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्याच्या पसंतीस उतरली होती. २०१५ मध्ये दोघांनी एकमेंकांना डेट करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर एक वर्षानी २०१६ मध्ये दोघेजण लग्न बंधनात अडकले. यानंतर मात्र, बिपाशा पडद्यावर दिसली नाही.

Post a Comment

0 Comments