बार्शी तालुक्यातील भोईंजे शिवारामध्ये अवैद्यरित्या ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक होत आहे अशी माहिती तालुका पोलिसांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशाने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करून एकावर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे, ४ जुलै रोजी पहाटे ३.३० वा. भोईंजे गावचे शिवारात भोईंजे ते श्रीपतपिंपरी रोडवरील घोरओढ्याचे
पुलावर पोहचलो. त्यावेळी तेथे बार्शी शहर पोलीस ठाणेकडील सरकारी वाहन व सपोनि उदारसो, पोक 912 / ढेंगल, पोक / 1748घोंगडे असे हजर होते.
मौजे भोईंजे गावात घोरओढ्यात कांही इसम ट्रक्टरमध्ये अवैद्यरित्या वाळू भरुन चोरुन नेत आहेत .त्यामध्ये पुलाचे जवळ घोरओढ्याचे काठी उभा असलेला लाल रंगाचा महिन्द्रा कंपनीचा ट्रक्टर व डंपींग ट्रेलर दाखवून तो मिळून आला आहे.तसेच त्यांचेसोबत असलेल्या इसमाचे नाव पत्ता 1) सुहास भागवत उमाटे वय 30वर्षे धंदा चालक रा. भोईजे ता. बार्शी असे असल्याचे सांगून तोच सदर ट्रक्टरचा चालक मालक असल्याचे सांगितले.
तो-1)4,00,000/- रु. एक लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा अल्ट्रा 2 ) 50,000/-रु. एक नंबर नसलेली लाल रंगाची डंपींग ट्रेलर त्यावर फाळक्यावर ज्ञानराज ट्रेलर भाटंबरे ता. पंढरपूर असे लिहिलेले जूनी वापरती किं. अं. 3) 200/- रु. दोन भगव्या रंगाच्या प्लास्टीकच्या पाटया किं. अं. 4) 200/- रु. दोन लाकडी दांडा असलेले लोखंडी फावडे किं.अं............ 4,50,400/- रु. एकुण अंदाजे किंमत. येणेप्रमाणे वरील नमूद वर्णनाचा ट्रक्टर हेड, डंपीग ट्रेलर, लोखंडी फावडे व पाट्या 04/07/2022 रोजी मध्यरात्री 01:30 वा. यातील आरोपी नामे 1) सुहास भागवत उमाटे वय 30वर्षे धंदा चालक रा. भोईजे ता. बार्शी हा भोईजे ते श्रीपतपिंपरी जाणारे रोडवरील घोरओढ्याच पुलावर मौजे भोईजे ता.बार्शी शिवारात घोरओढयातुन शासनाचे मालकीचे वाळूचे अवैधरित्या उत्खनन करुन त्याची चोरी करण्याचे प्रयत्नात असताना वरील नमूद वर्णनाचे ट्रक्टर, डंपीग ट्रेलर व त्यामध्ये वाळू भरणेसाठी लागणारे साहित्य यांचेसह किं.रु. 4,50,400 रु.चे मालासह मिळून आला आहे. म्हणुन माझी त्याचेविरुध्द सरकारतर्फे भा.द.वि. कलम 379, 511 प्रमाणे फिर्याद आहे.
0 Comments