येत्या १५ दिवसात अख्खी शिवसेना आमच्यासोबत येणार


 
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. राज्यात शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये संघर्ष होताना देखील दिसतोयं. शिरूर लोकसभेचे माजी खासदार उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून फारकत घेत मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. यानंतर शिरूर मतदार संघातील शिवसैनिकांनी त्यांचा निषेध केला. यावेळी अनेक घडामोडी देखील झाल्या ज्यांनी आढळरावांचा विरोध केला त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात झाले. यावर आता आढळराव पाटील हे स्वत: बोलले असून आंदोलन वगैरे हे सर्वकाही कटकारस्थान असल्याचे आढळराव पाटील म्हणाले आहेत.

शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मोठे विधान
आढळराव पाटील बोलताना म्हणाले की, अनेक शिवसैनिक मला भेटून माझ्या निर्णयाचे स्वागत करत आहेत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले नाहीत, हिंदुत्वाचे विचार सोडले नाहीयंत. त्यामुळे आम्ही काही चूक केली किंवा पक्ष सोडलायं किंवा आम्ही गद्दारी केली असे अजिबातच नाहीयं. सर्वांना हा माझा निर्णय पसंत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होणारी गळचेपी आणि होणारा अत्याचार हा सगळया शिवसैनिकांनी भोगालंय.

मतदार संघातील अनेक शिवसैनिक माझ्यासोबतच
पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले, ज्या लोकांनी माझ्याविरोधात आंदोलन केली, त्यातला एकही शिवसैनिक नव्हता. हे सर्व शिवसेनाच्या विरोधात कटकारस्थान आणि पक्ष विरोधी कारवाई करून पक्षाने बाहेर केलेली मंडळी आहे. मी शिंदे गटात गेलो म्हणून अनेकांनी पद मिळण्याच्या उद्देशाने आंदोलन केली आहेत. मतदार संघातील अनेक शिवसैनिक माझ्या सोबतच आहे. अनेकजण फोन करून सांगतात कि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पुढील पंधरा दिवसात सगळी शिवसेनासोबत राहणार आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासोबत राहणार आहे. यामध्ये कोणतीही अडचण नाही.

Post a Comment

0 Comments