विधानपरिषदेतील निवडणुकीमध्ये कॉंग्रेसची काही मत फुटली होती. यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर आता विधानपरिषदेत फुटलेल्या 7 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले. कॉंग्रेसने हंडोरे यांना 29 मतांचा कोटा ठेवला असताना त्यांना फक्त 22 मते पडली. याचा अर्थ कॉंग्रेसची सात मते फुटली असून या सात फुटीर आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांच्याकडे केली आहे.
विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसकडे एकूण 44 मते होती. कॉंग्रेस हायकमांडकडून पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत हंडोरे यांना मतदान करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर उर्वरित मते दुसरे उमेदवार भाई जगताप यांना मिळणार होती. मात्र या निवडणुकीत भाई जगताप विजय होऊन हंडोरे यांचा पराभव झाल्याने कॉंग्रेस आमदारांनीच पक्षशिस्त न पाळल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
0 Comments