शिवसैनिक व सर्वसामान्यांच्या कामासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरणार - खासदार ओमराजे निंबाळकर


तुळजापूर तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी  पदाधिकारी यांची बैठक माझयासह व आमदार ज़िल्हाप्रमुख कैलास पाटिल यांच्या उपस्थितित आज आयोजीत केली होती. शिवसेना जरी सत्तेमध्ये नसली तरी शिवसैनिक व सर्वसामान्यांच्या कामासाठी वेळप्रसंगी आपण यापुढे रस्त्यावर उतरणार आहोत

शिवसेनापक्षप्रमुख मा. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्याकडे ऑक्टोबर 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना अनपेक्षितपणे राज्याचे मुख्यमंत्री पद आले होते. त्यामुळे आदरणीय साहेबांना या पदाबाबत कसल्याही प्रकारचा मोह नव्हता त्यामुळे साहेबांनी हे पद कोणताही विचार न करता सोडले सुध्दा. त्यामुळे याबाबत कोणत्याही शिवसैनिकाने खचून न जाता आता यापुढे विरोधी बाकावर बसून देखील सर्वसामान्य नागरिकांची कामे पुर्णत्वास नेण्याकडे आपला कल वाढविला पाहिजे तसेच लवकरच युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत तुळजापूर येथे पक्षाचा जिल्हा मेळावा आयोजित करणार आहे 

शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब, पक्षप्रमुख आदरणीय श्री. उध्दवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदरणीय श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांनी तळागळातील रिक्षा चालक, टपरीवाल्यांना, कारखान्यावरील स्लिपबॉय इ.  पक्षाचे तिकीट देवून आमदार, मंत्री केले. परंतु हेच लोक आज  श्री. उध्दवजी ठाकरे साहेब यांची साथ सोडून गेले मात्र आज पुर्ण राज्यात पुर्ण शिवसैनिक हे उध्दवजी ठाकरे साहेबांच्या खांद्याला खादा लावून सोबत आहेत यातुन उध्दव साहेबांबद्दलची सहानुभुतीची प्रचिती आपल्याला दिसून येते. 

वंदणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभुमी नसताना साहेबांनी माझ्यावर व आमदार श्री. कैलासदादा पाटील यांच्यावर विश्वास दाखवुन आम्हाला आमदार व खासदार केले. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुखांच्या आशिर्वादाशी आणि पक्षप्रमुखांच्या विचारांशी कधीही गद्दारी न करता आम्ही दोघेही निष्ठेने पक्षप्रमुख आदरणीय उध्दवजी ठाकरे साहेबांच्या आणि शिवसेना पक्षाच्या सोबत राहणार आहोत

अनेक प्रकारची प्रलोभने असताना आमदार श्री. कैलास पाटील हे माझ्यासोबत व  उध्दवसाहेब ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे
राहिले याचा मला व आपल्या जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांना अभिमान आहे.  येणाऱ्या काही दिवसात जिल्हा परिषद, पंचायत समिती, व नगरपालिका यांच्या निवडणुका डोळ्यासमोर असून त्या निवडणुकीत देखील शिवसेनेला आपल्या सर्वांच्या साक्षीने भरघोस यश येईल व जिल्ह्यात यापुढे शिवसेनेची ताकत आपण वाढवू त्यासाठी तुम्हा सर्वांची सहकार्याची अपेक्षा देखील आहे. शिवसैनिकाने आपल्या कामाच्या माध्यमातुन 50 मतदारांची जोडणी आणि बांधणी करुन पुन्हा नव्याने पक्षबांधणीस सुरुवात करावी.

गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात धाराशिव जिल्ह्याला अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 7 टी.एम.सी पाणी, उस्मानाबादचे धाराशिव नामांतरण, यांसारखे ऐतिहासिक निर्णय घेवून जिल्ह्याच्या विकासात भर पाडली आहे.

याप्रसंगी तालुका प्रमुख श्री. जगन्नाथ गवळी, श्री. शामभाऊ पवार, श्रीमती शामलताई वडणे महिला ज़िल्हा संघटक  शहर प्रमुख श्री. सुधीर कदम, माज़ी जिप सदस्य राजअहमद पठाण,माज़ी तालुक़ा प्रमुख कमलाकर चव्हाण, श्री. संजय भोसले, अल्पसंख्यांक ज़िल्हा अध्यक्ष आमीर शेख, श्री. काशीनाथ भोरे, युवासेना तालुकाप्रमुख श्री.प्रतिक रोचकरी, नळदुर्ग शहरप्रमुख श्री. संतोष पुदाले, श्री. सोमनाथ गुड्डे, श्री. सुनिल जाधव, श्री.रोहित चव्हाण, श्री.चेतन बंडगर, श्री.अर्जुन आप्पा साळुंके, श्री.सागर इंगळे, श्री.अमोल गवळी, श्री. शाम माळी, श्री. सुनिल कदम, श्री. बालाजी पांचाळ, श्री. दत्ताप्पा बंडगर, श्री. दिनेश बंडगर, श्री. सरदार सिंग ठाकुर, श्री. बाळासाहेब शिंदे, श्री. बापूसाहेब नाईकवाडी, श्री. अमोल घोटकर, श्री. सिद्रामाप्पा कारभारी, श्री. विकास सुरवसे, श्री. नितीन ढेकणे, श्री. अंकुश नवगिरे, श्री. महादेव पवार, श्री. रविंद्र दळवे, श्री. अनिल भोपळे, श्री. शंकर गव्हाणे, श्री. जितेंद्र माने, श्री. सौदागर जाधव, श्री. बबन भोसले, श्री. विकास भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments