बापरे! करमाळा पोलिसात अजब गुन्हा; अल्पवयीन मुलगी म्हणाली माझ्या संमतीने शारीरीक संबंध झाले


करमाळा /प्रतिनिधी:

ऊसतोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये पीडित फिर्यादी दीड महिन्याची गरोदर असून अंगणवाडी सेविकेकडे संशयित आरोपीची आई नाव नोंदणी करण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. यातील फिर्यादी व संशयित आरोपी धुळे जिल्ह्यातील आहेत. ते करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथे ऊस तोडीसाठी आले होते. तेथेच दोघांमध्ये शारीरिक संबंध आले होते. हा गुन्हा पिंपळनेर पोलिस ठाणे (ता. साक्री) यांच्याकडून सीसीटीएनएस प्रणालीला ऑनलाईन 0 ने दाखल होऊन करमाळा पोलिसांकडे आला आहे.

यामध्ये अल्पवयीन निर्भयाने (शिक्षण 4 थी, रा. लोणेश्वरी मिलाटी, पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी निर्भया ही आई- वडील यांच्यासह धुळे जिल्ह्यात राहते. ते ऊसतोडीचे काम करतात. २१ वर्षाचा संशयित आरोपी हा त्यांच्याच गावात राहतो. तो फिर्यादी निर्भयाचा चुलत आतेभाऊ आहे. संशयित आरोपी व फिर्यादी हे लहान असतानाच त्यांचा विवाह ठरविला होता. परंतु ते सज्ञान झाल्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्याचे ठरले होते.


फिर्यादीचे आई- वडील ऊसतोडणीसाठी बहेरगावी जायचे तेव्हा बऱ्याच वेळा संशयित आरोपीचा परीवार फिर्यादीच्या परीवारासोबत असायचा. गेल्यावर्षी 2021 मध्ये दसरा झाल्यानंतर सुमारे 15 दिवसानी निर्भया व त्यांचा परिवार व आरोपीचा परिवार ऊसतोडीचा मुकदम मन्साराम (पुर्ण नाव माहीत नाही) याचेसह ऊसतोड कामासाठी करमाळा तालुक्यातील वाशिंबे तेथे आले.


ते सर्वजण ऊसतोडणीसाठी शेतात सोबत जायचे. त्यादरम्यान अल्पवयीन फिर्यादी निर्भया व संशयित आरोपी यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. सुमारे तीन महीन्यापर्यंत आम्ही एकमेकाशी प्रेमाच्या गप्पा मारत होतो. त्यानंतर आम्ही उसतोडणी करीत असताना सुमारे फेब्रुवारी ते एप्रिल 2022 या दरम्यान शेतात तिन वेळा त्यांच्यात शारिरीक संबंध झाले. ते शारिरीक संबंध फिर्यादीच्या मर्जीने झालेले आहेत.


ऊसतोडणीचे काम संपल्यानंतर फिर्यादी व संबंधित पिंपळनेर येथे गेले. त्यानंतर तब्बेत बिघडल्याने पिंपळनेर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले तेव्हा. ती दिड महिन्याची गरोदर असल्याचे समोर आले. त्यानंतर फिर्यादीने आत्याला म्हणजे संशयित आरोपीच्या आईला गावातील अंगणवाडी सेविकेला (नाव माहीत नाही) ‘भाची (फिर्यादी) गरोदर असुन तीची गरोदर असल्याबाबत नाव नोंदणी आपल्या अंगणवाडीत करून घ्या’ असे आरोपीच्या आईने सांगितले. त्यानंतर अंगणवाडीसेविकेने त्यांना धुळे येथे एका समितीकडे आणले.


त्यानतर फिर्यादीला उपचारासाठी धुळे येथील सिव्हील हस्पीटलमध्ये नेले. तेव्हा निर्भयाने ‘दोघांच्या संमतीने शारिरीक संबंध झाले असुन आम्ही दोघेही वयात आल्यानंतर लग्न करणार आहोत’, असे सांगितले. यामध्ये करमाळा पोलिसात संशयित आरोपीविरुद्ध कलम 376 (२) (j), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012चे कलम 3,4,5 (जे) (दोन), 5 (एल), 6 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मागर्दर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments