बीड जिल्ह्यातील परळीच्या नारायण वाघमोडेचा विवाह सरस्वती हिच्याशी २ वर्षांपूर्वी झाला होता. मागच्यावर्षी त्यांना एक मुलगी झाली. सरस्वती पुन्हा गर्भवती राहिली. छाया वाघमोडे (सासू) हिने आणि नवऱ्याने सतत गर्भलिंग निदान करायचा ध्यास घेतला. तिच्यावर बळजबरी करून गर्भलिंग निदान केले. त्यात तिला मुलगी होणार हे निष्पन्न झाले. त्या दोघांनी सरस्वतीच्या मागे गर्भपात कर अशी मागणी केली. तिने नकार देत आपल्याला हे मूल हवे आहे हे सांगितले. एक दिवस सरस्वती आजारी पडली.
तिला तपासायला शहरातील एका स्वामी नावाच्या डॉक्टरला बोलावले. त्याने तिला एक इंजेक्शन दिले. दुसऱ्या दिवशी तिच्या पोटात दुखायला सुरवात झाली. तिच्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे. तिला दवाखान्यात नेण्यात आले. गर्भपिशवीला छिद्र पाडून गर्भ काढावा लागेल असे डॉक्टरने सांगितले. डॉक्टरने तसे केलेही. निर्दयीपणे तिचा गर्भपात केला. तिने ही आपबीती भावाला सांगितली. भावाने तिला पुण्याला आरामासाठी नेतो म्हणत आपल्यासोबत नेले. तिथे तिची तब्येत आणखी खालावली. तिने थेट परळी गाठत संभाजी नगर पोलीस ठाण्यात सासू आणि नवऱ्याविरोधात तक्रार केली. पोलिसांनी पती, सासू डॉ. स्वामी, प्रक्षा कावळे यांना ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल केला.
0 Comments