मलाही गुवाहाटी वरून बोलावलं आलं होतं - संजय राऊत


खासदार संजय राऊत यांनी "गुवाहाटी वरून आपल्याला देखील बोलावणे आले होते. मात्र, आपण बाळासाहेबांना मानत असल्याने तिकडे गेलो नाही" असे वक्तव्य केले आहे. ईडीची तलवार मानगुटीवर ठेवून भाजपने ही खेळी खेळली आहे आणि त्यामुळेच हे बंड झाल्याचे सांगत त्यांनी राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

मलाही ईडीकडून चौकशीसाठी बोलावणे आले मात्र मी चौकशीला सामोरे जाणे स्वीकारले. आपण खरे असताना भीती कशाची? खोटं वागणं भाजपची चाल आहे. तीच शिवसेनेतून बाहेर पडलेले लोक शिकले आहेत. खासदार संजय राऊत यांनी केलेले या दाव्यामुळे राजकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments