उस्मानाबाद नामांतरणाच्या मुद्दावरुन मारहाण गुन्हा दाखलउस्मानाबाद नामांत्रणाच्या विषयावर नळदृग येथे दोन गटात तुबळ हाणामारी झाली आहे यामध्ये तरुणांवर कोयत्याने वार केले. यात तिघे जखमी झाले. ही घटना तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे शनिवारी रात्री घडली. पांचाळ ( रा. जखमींची नावे दाखल सिद्धेश्वर वर्दे , अविनाश खंडू वर्दे ( दोघे रा. काटगाव , ता. तुळजापूर ) व बसवेश्वर बाबुराव तुळजापूर ) अशी आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आले आहे. 

दुसरा गटातील दोघे जखमी दरम्यान , काटगावमधील दुकान बंद कर म्हणत केलेल्या मारहाणीत हाफिज मुजावर ( वय ६५ ) , तमिज मुजावर ( वय २१ , रा. काटगाव , तुळजापूर ) हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना जैनोद्दीन मुजावर याने दाखल केले. या घटनेची नोंद शासकीय रुग्णालयातील सिव्हिल चौकीत झाली आहे याबाबत नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे 

अमर सिध्देश्वर वरदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड संविधान कलम 307, 324, 143, 147, 148, 149, 504, 506 शस्त्र कायदा कलम 4, 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे  हाफिज समीर मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड संविधान कलम 307, 452, 143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments