बार्शी! रस्तापूर शिवारात शेळ्या चारल्याने महिलेला मारहाण


बार्शी तालुक्यातील रस्त्यावर शिवारात शेळ्या चारण्याच्या कारणावरून महिलेला मारहाण केल्या प्रकरणी छाया नागनाथ गायकवाड व नागनाथ गायकवाड रा दोघे रस्तापूर ता बार्शी यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी नंदा राजेंद्र भोसले रा. रस्तापूर ही महिला दि १७ रोजी सकाळी अकरा वाजता रस्तापूर ते कोरफळे या रस्त्यालगत आरोपीच्या शेतजवळून तिच्या शेळ्या घेऊन जात असताना वरील आरोपीनी शिवीगाळ करून दगडाने मारहाण करून जखमी केले तसेच परत आमच्या शेतात आली तर जीवे मारिन अशी धमकी दिली आहे याबाबत भादवी ३२४,५०४,३४ प्रमाणे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments