सोलापूर! पोलीस असल्याचे सांगत महिलेची सोनसाखळी केली लंपास

 

सोलापूर/प्रतिनिधी:

पत्रकार भवन ते सातरस्ता या दरम्यान स्कुटीवरून जाणाऱ्या महिलेस थांबवून मोटारसायकल वरुन आलेल्या तिघांनी, आम्ही पोलिस आहोत असे सांगून महिलेच्या गळ्यातील ४० हजाराची सोन्याची साखळी कागदामध्ये गुंडाळून दिल्यासारखी करून चोरून नेली.


या प्रकरणी तीन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मंगला गोपाळ देशमुख (वय ६३ रा. दत्तनगर, जुळे सोलापूर) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, देशमुख या त्यांच्या स्कुटीवरून जात होत्या. त्यावेळी एका मोटारसायकलवर दोघेजण देशमुख यांच्या जवळ आले. हम आपको पिछेसे कितना आवाज दे रहे है, आप क्यु नही ठहरे, आप गाडी बाजुको लिजीए तेंव्हा देशमुख यांनी गाडी बाजूला घेतली. तेंव्हा त्या दोघांपैकी एकाने यहाँ बढी चोरी हो गई है, आप सोने के गहने पहनकर कहाँ जा रहे हो, यहॉपर चेकिंग चालू है असे सांगितले.

यावेळी तेथून पायी जाणाऱ्या एकास बोलावून आम्ही पोलिस आहोत असे सांगितले. त्याच्या गळ्यातील सोनसाखळी काढण्यास भाग पाडले. साखळी एका कागदात गुंडाळून त्या व्यक्तिच्या बॅगमध्ये ठेवली. तेंव्हा देशमुख यांना पोलिसांची कार्यपध्दती ही अशीच असावी असे वाटून आरोपींच्या सांगण्यावरून देशमुख यांनी सुध्दा त्यांच्या गळ्यातील ४० हजाराची सोन्याची साखळी काढून दिली. ती कागदात गुंडाळल्यासारखी करून ती देशमुख यांना त्यांच्या पर्स मध्ये ठेवण्यास सांगितली. तेंव्हा दुसऱ्या व्यक्तिला सांगितले की, पुढच्या चौकात चेकिंग कोण केले तर त्यांना शुक्ला साबने
चेकिंग की है असे सांगण्यास सांगितले. असे म्हणून ते दोघे मोटारसायकलवर निघून गेले. त्यानंतर गाडी सर्व्हिसिंगला टाकून घरी आल्यानंतर देशमुख यांनी पर्स पाहिली असता त्यात सोन्याची साखळी नव्हती. तेंव्हा देशमुख यांना आपल्याला फसविले गेल्याचे लक्षात आले. या फिर्यादी वरून तीन अनोळखी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments