खांडवी गावाजवळ जीप चालक आणि लक्झरी बसला पाठीमागून धडक दिल्यामुळे त्यामध्ये गंभीर त्या जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान २ जुलै रोजी मृत्यू झाला आहे. त्यांची कुटुंबीय दुःखात असल्यामुळे या घटनेची फिर्याद १८ जुलै रोजी मयत महिलेचा मुलगा दशरथ रामभाऊ माळी रा. मसा खंडेश्वर ता. कळंब, जि. उस्मनाबाद यांनी तालुका पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे.
भागुबाई रामभाऊ माळी हि उपचारा दरम्यान मयत होण्यास कारणीभुत होवुन जीप नं- MH 01 CD 1754 चे अंदाजे 2, 00, 000/- रूपयाचे नुकसान केले आहे. जीपचालक रविकांत शशीकांत थोरात रा. मसा खंडेश्वर ता. कळंब, जि. उस्मनाबाद भादवी २७९ ३04-A ३३७ ३३८ ४२७ व मोटरवाहन अधिनियम 184 नुसार तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments