'मातोश्री'त सत्ताकेंद्र, पवार - ठाकरेंमध्ये तब्बल ७० मिनिटांपासून खलबतं, मोठा निर्णय होणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात आता प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत.शिवसेनेते बंडखोर आमदार महाराष्ट्रात सत्ताबदलासाठी तिकडे गुहागरमध्ये रणनीती आखत आहेत.

ते विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्याच्या तयारीत आहेत. तर इकडे
महाविकास आघाडी सरकारदेखील बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी रणनीती आखत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी बैठक पार पडली.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील उपस्थित होते. गेल्या दोन तासांपासून ही बैठक सुरु होती. या बैठकीत काहीतरी मोठा निर्णय येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. महाविकास आघाडी सरकारकडून हे सरकार वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्याचात एक भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळी आधी शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल आले. त्यांच्यात बराचवेळ चर्चा सुरु होती या बैठकीत आता पुढील रणनीती काय आखायची यावर चर्चा झाली.

जवळपास तासभर ही चर्चा झाल्यानंतर संजय राऊत मातोश्रीवर आले. त्यानंतर शिवसेनेचे आणखी काही खासदार मातोश्रीत जाताना दिसले. दरम्यान, मातोश्रीबाहेर अनेक शिवसैनिक जमले होते. त्यांच्याकडून घोषणाबाजी सुरु होती. जवळपास दोन तास बैठक झाली. दोन तासांनंतर पवार मातोश्रीबाहेर पडताना दिसले. या बैठकीनंतर महाविकास आघाडी सरकार बंडखोर आमदारां विरोधात कायदेशीर लढाई लढते की आणखी दुसरा काही पाऊल उचलतं पाहणं महत्त्वाचं ठरेल  (राज्यातील सर्व पोलीस स्टेशन हाय अलर्टवर, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरण्याची धास्ती) मातोश्रीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक सुरु असताना विधान भवनात देखील हालचालींना वेग आला होता.

विधान भवनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत सलग दोन तासांपासून बैठक सुरु होती. या बैठकीला शिवसेना खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई उपस्थित होते. शिवसेनेने 16 आमदारांच्या अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर विधान भवनात नरहरी झिरवळ यांच्या दालनात बऱ्याच वेळेपासून खलबतं सुरु आहेत या बैठकीनंतर झिरवळ पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Post a Comment

0 Comments