दि. 02/06/2022 रोजी गोणेवाडी ता.मंगळवेढा शिवारामध्ये एक बेवारस 20 ते 25 वर्षाचा युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळुन आल्याची बातमी मंगळवेढा पोलीसाना मिळाली होती. त्यावरुन पोनि रणजित माने हे स्टापसह घटनास्थळी रवाना झाले. तेथे डोक्यात व पोटात जखम असलेला बेवारस मृतदेह मिळुन आला होता.
पोलीसांनी गोणेवाडी व परिसरात केलेल्या चौकशी वरुन सदरचा मृतदेह हा तुषार धनवडे रा वाटंबरे ता सांगोला जि सोलापुर याचा असलेबाबत चौकशीत निष्पण झाले होते. त्यावरुन पोलीसानी सदर वाटंबरे ता सांगोला भागात चौकशी केली. असता सदर युवकाचा खुन हा अनैतिक संबंधातुन झालेबाबत माहिती मिळाली होती.
त्यावरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे सखोल तपास करुन सदर युवकाचा खुन करणारा आरोपी हा दत्तात्रय भारत शिंदे रा गोणेवाडी ता मंगळवेढा असलेबाबत तपासात निष्पण झाले होते. मंगळवेढा पोलीसानी तात्काळ सदर आरोपीचा फोटो मिळवुन केलेल्या तपासात तो शिरसी ता मंगळवेढा येथील जंगलात असलेबाबत माहिती मिळाली, त्यावरुन पोलीसांनी शिरसी परिसरात शोध घेतला असता आरोपी दत्तात्रय भारत शिंदे रा गोणेवाडी हा तेथे मिळुन आला.
सदर आरोपीकडे घडलेल्या गुन्ह्याचे अनुषगाने सखोल चौकशी केली असता त्यांनेच तुषार धनवडे याचा अनैतिक संबंधाच्या कारणावरुन खुन केल्याचे कबुल केले, त्यावरुन आरोपीस गुन्ह्यात अटक केली असुन पुढील तपास पोनि रणजित माने हे करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते , सोलापुर ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक हिमत जाधव, सोलापुर ग्रामीण, विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर विभाग पंढरपुर, राजश्री पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली रणजीत माने पोलीस निरीक्षक, मंगळवेढा पोलीस ठाणे सपोनि सत्यजित आवटे, सपोनि अमोल बामणे सोबत सपाफौ/अविनाश पाटील, सपोफौ दत्तात्रय तोंडले, पोहेकॉ प्रमोद मोरे, पोहेकॉ अर्जुन मुळे, पोहेकॉ महेबुब शेख पोना दयानंद हेंबाडे, पोना विभुते, पोना हजरत पठाण, पोना सचिन बनकर, पोकॉ राजु आवटे यांनी कारवाई केली आहे, तसेच गोणेवाडी व लेडवे चिचांळे ता मंगळवेढा येथील पोलीस पोटील हिमंत पाटील व संजय मेटकरी यानी हि सदर गुन्ह्याचे तपास कामी मदत केली आहे. पुढील तपास रणजीत माने पोलीस निरीक्षक मंगळवेढा पोलीस ठाणे हे करत आहेत.
0 Comments