बार्शी - राष्ट्रवादीचे गटनेते नागेश अक्कलकोटे प्राणघातक हल्ला प्रकरणात नगरसेवक विजय राऊत सह तीन जणांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश जयेंद्र जगदाळे यांनी फेटाळला आहे
या संदर्भाने अॅड. विकास जाधव यांनी सांगितले की, १ ऑगस्ट २०१४ रोजी अक्कलकोटे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ८४/२०१४ भा.द.वि. १४३, १४७, १४८, ३०७, ३२९, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४९ व आर्म अॅक्ट २५ (२) प्रमाणे विजय राऊत, दिपक राऊत, सोन्या हाजगुडे, मुन्ना बोते, डंग्या यादव, दिपक धावारे, रणजित चांदणे, प्रकाश राऊत, विशाल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी दिपक राऊतच्या अटकपुर्व जामीनावेळी तत्कालीन तपास अधिकारी सालार चाऊस यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मृदुला भाटकर यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले होते. तसेच फिर्यादीने संबंधीत गुन्ह्याची कागदपत्रे मागुनही न दिल्यामुळे माहिती अधिकारान्वये पुणे खंडपिठाच्या आदेशानव्ये माहिती घ्यावी लागली होती. तसेच दरम्यानच्या काळात चाऊस यांच्यावर पोलिस खाते अंतर्गत कारवाई व बदली झाली होती. दरम्यान चाऊस यांनी विजय राऊत, दिपक धावारे, रणजित चांदणे यांचे नावे सी.आर.पी.सी. १६९ प्रमाणे वगळण्याचा अहवाल व इतर आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयाकडे सादर केले होते.
उच्च न्यायालयात यापूर्वी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने दोन्ही बाजुचे युक्तिवाद ऐकून काही निरीक्षण नोंदवत राऊत यांना निर्णयाची इच्छा आहे की अपील मागे घेताय अशी विचारणा केल्यानंतर दुपारी अडीच पर्यंतची वेळ निंबाळकर यांनी मागुन घेतली. त्यानंतर न्यायालयात अॅड. निंबाळकर यांनी राऊत यांची अपील मागे घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर न्यायालयाने अपील काढून टाकल्याचे जाहीर केले आहे.
तदनंतर विजय राऊत सह तीन जणांनी बार्शी जिल्हा
सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी 6 मे 2012 रोजी अर्ज दाखल केला होता यावर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जगदाळे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी राऊत यांच्या वतीने अॅड.हर्षद निंबाळकर अॅड.महेश जगताप अॅड.सागर रोडे यांनी बाजू मांडली तर फिर्यादी अक्कलकोट यांच्या वतीने अॅड.अभिजीत कुलकर्णी अॅड.विकास जाधव अॅड. अक्षय काशीद यांनी बाजु मांडली सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अॅड. राजश्री कदम यांनी बाजु मांडली या सुनावणीच्या दरम्यान उपस्थित झालेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सध्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना न्यायालयात बोलवून त्यांचीही बाजू न्यायालयाने ऐकली होती .
PI शेळके यांनी म्हणणे मांडले
अति. सत्र न्यायालयात सुनावणीवेळी सरकार पक्षाच्या वतीने आरोपी अटकेची गरज ठामपणे मांडण्यात आली तसेच पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचे लेखी आणि तोंडी म्हणणे ही सादर केल्याचे ऍड. जाधव यांनी सांगितले.
0 Comments