उद्धव ठाकरे यांचा अखेर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा



उद्धव ठाकरेंचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. तसेच विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीरकेले आहे. जनतेशी संवाद साधत असताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

जनतेशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली. शिंदे यांनी बंड केल्यामुळे सरकार अल्पमतात आले. त्यामुळे त्यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे सरकार कोसळणार, हे जवळपास स्पष्ट होते. माझ्याच लोकांनी मला दगा दिला, असे भावूक विधान ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत केले.

‘रिक्षावाले, हातभट्टी वाले यांना खूप काही दिले ते आपल्यावर नाराज’

– सोनिया गांधी, शरद पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील सहकाऱ्यांचे आभार, या ठरावाच्या वेळेला मी, आदित्य, देसाई आणि परब हे चारच शिवसेनेचे मंत्री.


 
– तातडीने मंजुरी दिली, ज्यांनी हे करायला पाहिजे होते, ते – नामनिराळे, ज्यांचा विरोध भासवला, ते सोबत होते.


 
– रिक्षावाले, हातभट्टी वाले यांना नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, मंत्री, ज्यांना मोठं केलं, ज्यांना सत्ता दिली, ती लोकं आज आपल्यावर नाराज होता.

Post a Comment

0 Comments