कारी शिवारामध्ये बाप-लेकांनी पुतण्यास मारहाण केल्याची घटना घडली आहे, अमोल वंसत जाधव, (वय ४२) रा कारी,ता. जि. उस्मानाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी हे शेताकडे जात असताना तू विकत घेतलेल्या शेतामध्ये वहिवाट का करतो असे म्हणत चुलते प्रकाश भाऊ जाधव व चुलत भाऊ सौदागर प्रकाश जाधव काठीने व लाथाबुक्क्यांनी शिवीगाळ केली आहे, तू जर शेतामध्ये वहीवाट केली तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे ठार मारू आणि आमचा नाद पुन्हा करायचा नाही अशी धमकी दिली आहे. भांडण सोडवल्यानंतर गावातील काही लोक पांगरी पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आले, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय पांगरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार पांगरी पोलिस ठाण्यामध्ये भादवि कदम ३२३,३२४,३४,५०४,५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments