परंडा- राजुरी - घारगांव- सिरसाव- हिंगणगांव ते रामा ता. परंडा येथील पुलाचा भुमी पुजन समारंभ आज आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांच्या शुभहस्ते, ज्ञानेश्वर तात्या पाटील (माजी आमदार ), गौतम लटके ( जिल्हा प्रमुख शिवसेना), दत्ता अण्णा साळुंके (माजी सभापती/जि.प.उस्मानाबाद) बालाजी गुंजाळ, अनिता पोपट चोबे (माजी उपसभापती पं. स. परंडा), संतोष गोरे (सरपंच-हिंगणगांव बु.) जे.एल. मळगीकर उप विभागीय अभियंता सा.बां.उपविभाग परंडा, उ.ब. झगडे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग उ. बाद यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.०३/०६/२०२२ रोजी संपन्न झाला. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी काम सुरू असताना शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपाचा सिमेंट पाईप टाकून रस्ता सुरू करून द्यावा व या सिमेंट पाईप रस्त्यासाठी लागणारा खर्च मी स्वतः उचलणार आहे अशी ग्वाही आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यावेळी दिली.
0 Comments