तब्बल नऊ तास मृतदेह पोलिस ठाण्यात होता पडून मयतावर छत्तीस तासानंतर अंत्येविधी उरकले
पोलिसांनी मारहाण करुन अपमानित केल्याने मनस्थिती दुखावलेल्या पैठण तालुक्यातील दाभरुळ येथील विवाहित तरुणाने टोकाची भूमिका घेत विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जामखेड ता. अंबड येथे सोमवारी ता. १३ सकाळी उघडकीस आली. दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांच्या जमावाने मयत तरुणाचा मृतदेह थेट पाचोड पोलिस ठाण्यात आणून ठेवल्यानंतर मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्धात जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत अंत्येविधी करणार नसल्याचा आक्रमक भूमिका घेतल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरणात निर्माण झाले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखत उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांनी तातडीने पाचोड पोलिस ठाण्यात दाखल होत संतप्त नातेवाईकांना शांत करत दोषीं विरुध्दात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल नऊ तास पोलिस ठाण्यात पडून राहिलेला मृतदेह राञी बारा वाजता रुग्णवाहिकेत टाकून पाचोड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर मंगळवारी ता. १४ पंचनामा झाल्यानंतर दुपारी उपस्थित वैद्यकीय अधिका ऱ्याकडून शवविच्छेदन केल्यानंतर शोकाकुल वातावरणात मयतावर छत्तीस तास उलटल्यानंतार अंत्येविधी करण्यात आला तेव्हा वातावरण शांत होऊन पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मोहन गोरख राठोड वय (२४ ) रा. दाभरुळ ता. पैठण असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की, दाभरुळ ता. पैठण येथील मोहन राठोड यांच्या विरुध्दात त्यांच्या पत्नी रोशनी राठोड हिने पत्तीसह सासरकडील सहा मंडळी विरुध्दात पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत असल्याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात भांदवी कलम ४९८ अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी ता. ११ रोजी मोहन राठोडसह घरच्यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतल्यानंतर पोलिस कर्मचारी चव्हाण , नांदवे यांनी नातेवाईकांसमोर मारहाण करून अपमान केल्याची भावना मोहन राठोडला अस्वस्थ करून गेली. शिवाय पन्नास हजाराची मागणी देखील करण्यात आल्याचा आरोप करत त्या स्थितीत त्याने सोमवारी ता. १३ सकाळी घराबाहेर पडून थेट जामखेड ता. अंबड जामुवंत मंदिर जवळील डोंगरावर जात सोबत घेऊन आणलेल्या विष प्राशन करुन आत्महत्या केली.
पोलिसांनी मारहाण केल्यानेच मोहनने आत्महत्या केल्याची वार्ता परिसरात वेगाने पसरली. त्यामुळे नातेवाईकांच्या भावना तीव्र झाल्या संतप्त जमाव सोमवारी दुपारी तीन वाजता मृतदेह घेत पोलीस ठाण्यावर धडकला त्यांनी दोषी पोलिसांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करून घोषणाबाजी सुरू केली. मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाल्याने वातावरण चिघळण्याचे संकेत मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल सहाय्यक पोलिस निरीक्षक माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक नागरगोजे हे आपल्या फौजफाट्यासह तिकडे धाव घेतली. तसेच पाचोड पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचारी हजर झाले
उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल आणि पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, यांनी नातेवाईकांची समजूत घालून मृतदेहावर शवविच्छेन करुन अत्येविधी केल्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टनूसार योग्य ती कारवाई केली जाण्याचे आश्वासन देऊनही नातेवाईक राजी होत नसल्याने शिवाय नातेवाईकांच्या आडमूठ धोरणापुढे पोलीसही काही काल हत्तबल झाल्याचे पाहावयास मिळाले. मृतदेह फुगायला लागल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या आश्वासन मान्य करत नातेवाईक राजी होताच पोलिसांनी रुग्णवाहिकेला पाचारण करुन पोलिस ठाण्या समोर आणून ठेवलेला मृतदेह तब्बल नऊ तास उलटल्यानंतर राञी १२ वाजता पाचोड ग्रामीण रुग्णालयात आणून ठेवला. मंगळवारी ता. १४ सकाळी पंचनामा करुन घेतल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डाँ. बाबासाहेब घुगे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर दाभरुळ येथे शोकाकुळ वातावरणात मयत मोहन राठोड यांच्यावर दुपारी साडेतीन वाजता अंत्येविधी करण्यात आले. तूर्तास याप्रकरणी पाचोड ता. पैठण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येऊन पुढील तपास जिल्हा पोलिस अधिक्षक ग्रामीण मनिष कलवनिया, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, उपनिरीक्षक सुरेश माळी हे करीत आहे.
0 Comments