रतीबाचे दूध वाढण्यासाठी चाललेल्या महिलेला भरधांव वेगाने आलेल्या मोटरसायकलने पाठीमागून धडक दिल्याने व महिला व मोटरसायकल चालक दोघेही जखमी झाले. ही घटना दि. ३० मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
याबाबत महिलेची सून पूजा समाधान शिंदे (वय १९), रा.
कुसळंब, ता. बार्शी यांनी फिर्याद दिली आहे. पूजा शिंदे यांची सासू सुरेखा भास्कर शिंदे (वय ५५) या घराच्या बाजूस रहाणाऱ्या विजय शिंदे यांच्या घरी रतीबाचे दूध वाढण्यासाठी रस्त्याने जात असताना, येरमाळ्याकडून आलेल्या मोटरसायकल (क्र. एमएच-४४- एए-७९५५ ) चालकाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्यांचा डावा पाय मोडला, तसेच तोंडाला व हाताला खरचटले. मोटरसायकलचीही मोडतोड झाली.
चालकाचे नांव जयसिंग उत्तमराव गायकवाड, रा. धनेगांव, ता. कळंब असल्याचे समजले. त्याचेही अंगास ठिकठिकाणी खरचटले, सासू सुरेखा शिंदे यांना उपचारासाठी बार्शीच्या जगदाळे मामा हॉस्पिटल येथे आणले. परंतु डाव्या पायाला गंभीर दुखापत असल्याने शस्त्रक्रियेसाठी गंगामाई हॉस्पिटल, सोलापूर येथे नेले होते. त्यांना दि. १६ जून रोजी घरी आणले. दि. २१ जून रोजी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात पूजा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जयसिंग उत्तमराव गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
0 Comments