वैराग ! लोखंडी रॉडने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ; पाच जणांवर गुन्हा दाखल


वैराग/प्रतिनिधी:

आमच्या दवाखान्यातील कंपाउंडरला शिवीगाळ का केली असे म्हणत वैराग मधील आझाद चौकामध्ये दोघाजणांना लोखंडी रॉड वायर ने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी डॉक्टरसह पाच जनावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी, फिर्यादी अजय विश्वास काळे वय २९ वर्षे रा. आण्णाभाऊसाठे नगर वैराग ता.बार्शी यांनी  २८ जून रोजी रात्री १०.३० वा.चे सुमारास फिर्यादी व मित्र सचीन देवकुळे असे मोटारसायकलवरुन वैराग येथील आझाद हिंद चौक येथे आलो असता डक्टर जयवंत बाबुराव गुंड व त्यांचेबरोबर असणा-या चार अनोळखी लोकांनी आम्हाला थांबवुन तुम्ही आमचे दवाखान्यात येवुन आमच्याच कंपाउंडरला शिव्या देतो का देतो म्हणत लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच मित्र सचीन देवकुळे यासही मला सोडविण्यास आला असता त्यालाही डक्टर गुंड व त्याचेबरोबरील लोकांनी काठीने, केबल वायरने मारहाण केली आहे, म्हणुन माझी डक्टर जयवंत बाबुराव गुंड राहणार वैराग व अन्य चार जणांवर भारतीय दंड संहिता १४३ १४७ १४८ १४९ ३२५ ३२४ ३२३ ५०४ ५०६ अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती ( अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम  3 ( 1 ) (r), 3 (1) (s), 3 (2) (va) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments