सोलापूर:
गावातील मागासवर्गीय वस्तीमध्ये मंजूर पाणी पुरवठा योजनेतून पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा पाठपुरावा करताना 500 रुपये लाच मागून स्विकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
१. हेमंत राजाभाऊ विधाते, वय ५० वर्षे, व्यवसाय नोकरी पद शाखा अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा
विभाग, उपविभाग मोहोळ, जिल्हा परिषद सोलापूर
२. सिद्रामप्पा मल्लीकार्जुन वैधकर, वय ४३ वर्षे, व्यवसाय नोकरी, पद कनिष्ठ सहायक, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, उपविभाग मोहोळ, जिल्हा परिषद सोलापूर
३. गंगाधर हणमल्लु फुलानुवार, वय ३३ वर्षे, व्यवसाय नोकरी, पद स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, उपविभाग मोहोळ, जिल्हा परिषद सोलापूर यांना अटक करण्यात आली आहे.
यातील तक्रारदार यांचे वडिल मु.पो हिंगणी (नि) या गावचे सरपंच असुन तक्रारदार यांचे गावामध्ये पाणीटंचाई असल्याने त्यांचे गावाकरीता अनुसुचित जाती व नवबौध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे सन २०२१-२०२२ या योजनेअंतर्गत समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर यांचेकडुन पाणीपुरवठा पाईपलाईन करणे या कामास मंजुरी मिळालेली होती. सदर योजनेअंतर्गत मंजुर पाणीपुवठा पाईपलाईन करणेचे कामाचे अनुषंगाने तक्रारदार हे त्यांचे वडिलांचे वतीने पाठपुरावा करण्याकरीता तक्रारदार हे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, उपविभाग मोहोळ येथे पाठपुराव्याकरीता गेले असता यातील आरोपी क्र.०१ विधाते यांनी सदर कामाचे अंदाजपत्रक लवकर तयार करुन तांत्रिक मंजुरी मिळवुन देण्यास मदत करण्यासाठी आरोपी क्र. ०२ वैधकर यांचेकरीता रु २०० व आरोपी क्र. ०३ फुलानुवार यांचेकरीता ३०० रुपये लाचेची मागणी केली. सदर प्रकरणामध्ये आरोपी क्र.०२ व ०३ यांनी देखिल त्यास संमती दिल्याने यातील आरोपी क्र.०१ विधाते यांनी वरील आरोपींकरीता मागणी केलेली एकुण ५०० रुपये लाच रक्कम त्यांचे कार्यालयामध्ये स्विकारली असता यातील तीनही आरोपी लोकसेवकांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे व त्यांचेविरुध्द सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही कारवाई उमाकांत महाडीक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर पोलीस अंमलदार सोनवणे, घाडगे, सण्णके यांनी केली
0 Comments