वरिष्ठांच्या आदेशाला दाखवला 'घंटा', वाहकावर कारवाई होणार का?
वाहकाची मुजोरी ?
सर्वसामान्य प्रवाशी आणि नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या वाहकांकडून अशी अपेक्षा कुणालाही नाही. त्यामुळेच, वरिष्ठांच्या आदेशाला घंटा दाखवणाऱ्या संबंधित वाहकांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. तसेच, वरिष्ठही कारवाईची धारिष्ठ दाखवतील का हेही आगामी काळात पाहावे लागेल.
आगळगाव बाभुळगाव रोडवर असलेल्या भोयरे गावासाठी (वाढीव वस्ती) मागणी केलेला "विनंती थांबा" सोलापूर विभाग नियंत्रक यांच्या सहिनिशी जावक क्रमांक १८/I 14035 चे मंजूरी पत्र दिनांक 02/07/2018 रोजी संदर्भित मागणीदार व आगार व्यवस्थापक बार्शी यांना त्या बाबत सूचना देणे बाबत कळविले तसे पत्र माहितीसाठी दिले पण आहे
या बाबत आगार व्यवस्थापक बार्शी यांना भेटून मागणीदार यांनी सदर विषय बाबत सर्व चालक वाहक यांना प्रवाशी चढ उतार करणे बाबत सूचना केल्या आहेत असे तोंडी सांगितले
पण आज दिनांक 23 जून रोजी 3:30 वाजता बार्शी आगारातून निघणारी बार्शी चारे बस क्रंमाक MH 20 BL 0039 ही बार्शी डेपोची बस प्रवासी घेऊन निघाली असता भोयरे गाव च्या महिला प्रवासी वाहकाला विनंती करत होत्या की आम्हाला वरील स्टॉप गाडी थांबवायची आणि तिथे उतरायचं आहे (आमच्याकडे ओझ आणि ऊन असल्याने) तरी वाहकाने कोणाच्याही विनंतीला न जुमानता तुम्हाला काय लय चालत जायचं आहे का इथ तर आहे ५० फूट अंतर असे मनाचे उत्तर देऊन 'एकेरी भाषेत' बोलत काय "स्टॉप फिफ" मला नाही माहित असे उत्तर देऊन पुनश्च एकदा हाथ जोडून विनंती केली तरी मनाचेच खर केले शेवटी मागील स्टॉप वरच सोडले
सदर विषयात आगार व्यवस्थापक बार्शी यांनी संभदित विनंती बस थांबा मंजूर नामंजूर बाबत चालक वाहक यांना प्रवाशी चढ उतार करणे बाबत सूचना देण्यात याव्या अशी मागणी प्रवासी यांच्याकडून होत आहे आणि ते त्याबाबत त्या वाहकाची कान उघडनी करून कमीत कमी लेडीज प्रवासी यांना तरी व्यवस्थित भाषेत बोलण्यास तोंडी सूचना देतील अशी अपेक्षा ?
0 Comments