भारतीय महिला क्रिकेटचा कणा मानल्या जाणाऱ्या मिताली (Mithali Raj ) राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मिताली राज गेली २३ वर्षे क्रिकेट खेळत होती, आता बुधवारी वयाच्या ३९ व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा केला. मिताली राजने (Mithali Raj ) दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या तिच्या क्रिकेट कारकिर्दीत पूर्णपणे राज्य केले. ती भारतातील महिला क्रिकेटची ओळख असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक विजयही मितालीच्या नावावर आहेत. अशा परिस्थितीत तिने निवृत्ती घेणे ही महिला क्रिकेट विश्वातील मोठी घटना मानली जात आहे.
निवृत्ती घेताना मिताली राज भावूक..
३९ वर्षीय मिताली राजने आज (८ जून) ट्विटरवर एक
दीर्घ संदेश जारी करून निवृत्तीची घोषणा केली. मितालीने तिच्या मेसेजमध्ये लिहिले की, जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी परिधान करून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले तेव्हा मी लहान होते. हा प्रवास सर्व प्रकारचे क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता, गेली २३ वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी आहेत. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.
0 Comments