जिल्हा समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील यांच्यावर आमदार राम सातपुते यांनी भ्रष्टाचाराचे केलेले आरोपाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी तर होणार आहे, चौकशीनंतर काय कारवाई होणार हे ठरवले जाईल, अशी माहिती जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी बोलताना दिली.
दोन दिवसापूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या विषय निघाल्यानंतर माळशिरसचे आमदार राम सातपुते यादी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचा संदर्भात भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी असून इतक्या समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील या टक्केवारी घेतल्याशिवाय कामे करीत नाही, असा आरोप केला होता. अशा अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी सभागृहात करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ माजली होती.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी संपर्क साधून पत्रकारांनी यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, या टेबलला काम करणारा विस्ताराधिकारी नरळे यांचा पदभार काढून घेतलेला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेळीच याची दखल घेतली आहे. राहिला प्रश्न चंचल पाटील यांचा त्याची लवकरच चौकशी होईल आणि चौकशीनंतर काय कारवाई होणार? हे वरिष्ठ पातळीवर ठरवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments