वैराग! रुई शिवारात चाकूचा धाक दाखवून मोटरसायकल स्वराला ४ अज्ञात इसमाने लुटले



बार्शी तालुक्यातील गवळीशिवरा मध्ये चाकूचा धाक दाखवून वायरमेन च्या कुटुंबियांना चार अज्ञात इसमाने लुटले असून 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे वैराग पोलीस चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुखदेव फरिदा मस्के वय 40 वर्षे, रा. अंबाबाईची वाडी ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 17/6/2022 रोजी तुळजापुर येथुन आंबेगाव कडे येत असताना रुई गावच्या पुढे मुलानी यांच्या शेताजवळ रोडवर रात्री 09/00 वा. चे सुमारास चार अनोळखी इसम यांनी माझी मोटार सायकल अडवुन माझे मोटार सायकलची चावी काढुन घेवुन मला चाकुचा धाक दाखवुन मोटारसायकल HF डिलक्स क्र MH13AX3250 प्रवास करताना खिशातील 2500/- रु. रोख रक्कम, MIकंपणीचा मोबाईल त्याची किंमत 5,000/- रुपये जु. वा. किं. अं असलेला तसेच माझी पत्नी राधा हिचे गळ्यातील एक 10ग्रम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्र त्याची किंमत 40,000/- रुपये जु वा. किं. अं व एक ग्रम वजनाचे सोन्याचे कानातील झुबे त्याची किंमत5000/- रुपये जु. वा. किं. अं. असे एकुण 52,500/- रुपये किमतीचे सोन्याचे दागीने व मोबाईल व रोख रक्कम हिसकावुन जबरदस्तीने चोरुन घेवुन पळुन गेले आहेत. सदरचे चार इसम मला दाखवल्यास मी त्यांना ओळखेल. म्हणून माझी त्या चार अनोळखी लोकाविरुद्ध तक्रार आहे.  भादवि कलम नुसार 34,392 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments