उस्मानाबाद! सरमकुंडी फाटा जवळ ढाबा चालकाचा खून



वाशी तालुक्यातील सरमकुंडी फाटा येथील विश्वाराज पेट्रोलपंपा शेजारी असलेल्या श्याम शेखावटी या राजस्थानी ढाबा चालक अनुपसिंह सुशील शर्मा ( वय ३५ रा. भीर अवनीश मान भीर (राजस्थान) यांच्या दोघात पार्टनरशीपमध्ये चालवायला घेतला होता. परंतु पैशाच्या हिशोबाच्या कारणावरून अविनाश मान याने अनुपसिंह यांचा झोपेत हातोडी घालून व नंतर गळा चिरून खून करण्यात आला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ढाबा चालक अनुपसिंह सुशील शर्मा व अवनीश मान हे (दोघे रा. भिर जि. झुनझुन राजस्थान) मधील एका गावातील असून या दोघांनी विश्वराज पेट्रोल पंपाशेजारी श्याम शेखावती या नावाने राजस्थानी धाबा चालवत होते. परंतु धाब्यावरील जमा झालेला धंदा हिशोब व फोन पे वरील हिशोब अविनाश हा अनुपसिंह यास देत नसल्या कारणाने झाली होती. या कारणाने धाबा दि. ३१ मे रोजी बंद होता. ढाब्यावरील इतर कामगार जेवण करून झोपल्यानंतर अविनाश याने संध्याकाळी ९. ३० च्या सुमारास अनुपसिंह यांच्या डोक्यात हातोडीने घाव घातल्यानंतर त्याचा गळा चिरून खून केला. याप्रकरणी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments