कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातून टॉयलेटचा बहाणा करून आरोपीचे पलायन



कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातून आरोपी पलायन टॉयलेटचा बहाणा करून पोलिसांच्या हातावर तुरी, टॉयलेटचा बहाणा करून एक आरोपी कुर्डवाडी पोलीस ठाण्यातून पळून गेल्याची घटना माढा तालुक्यातील कुर्डुवाडीत गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

विशेष म्हणजे हातात बेड्या असतानाही तो पळून गेलाय राहुल ज्ञानेश्वर माळी (वय २४)असं पळून गेलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसात कलम  ४०८ नुसार आरोपी माळी वर गुन्हा दाखल झाला होत, गुरुवारी दुपारी त्याला न्यायालयात नेण्यात आले होते. त्याने टॉयलेटचा बहाणा करून कठड्यावरून उडी मारुन पळुन गेले आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहे, आरोपी संदर्भात किती निष्काळजीपणे पोलीस वागतात याचं उदाहरण कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातील घटनेवरून स्पष्ट झाले.

Post a Comment

0 Comments