बार्शी! ईसार पेट्रोल पंपावरून १० लाखांचा टिपर चोरीला ; शहर पोलिसांत गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी शहरालगत ईसार पेट्रोल पंप जामगाव रोड येथून दहा टायर टिपर चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ही घटना तीन जून ते पाच जून या वेळेमध्ये घडली आहे, फिर्यादी रामा कमलाकर ठोंगे (वय ४५) रा. निजाम जवळा ता. परांडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांढर्‍या निळ्या रंगाचा दहा टायर टाटा टिपर नंबर एम एच ३४ ए बी ८७ ४९ हा चोरीला गेला आहे त्याचे अंदाजे किंमत दहा लाख रुपये एवढी आहे, ईसार पेट्रोल पंपाच्या समोरील मोकळ्या जागेत तो लावला होता. रामा ठोंगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments