महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोरी केली आहे. ठाकरे सरकार धोक्यात आले असून, शिंदे गटाला शिवसेना मोठा धक्का देणार आहे. मात्र, त्यापूर्वीच शिंदे गटाचे ३४ आमदारांना अपात्र ठरणाऱ्याची रणनिती शिवसेनेने आखली आहे.
दरम्यान आधीच १२ आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नगहरी झिरवळ यांनी कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. विधिमंडळातील शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, बालाजी किन्नीकर, अनिल बाबर, भारत गोगावले, प्रकाश सुर्वे, महेश शिंदे, अब्दुल सत्तार, यामिनी जाधव, संदीपन भुबरे, संजय शिरसाठ, लता सोनवणे या आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यावर येत्या सोमवारपर्यंत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या ३४ आमदार कारवाईची विनंती केली आहे. तसेच ४६ पानांची याचिका विधानसभा अध्यक्षांना देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या पत्राचा आधार घेऊन त्यातील नमूद ३४ आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. संविधानाच्या अनुछेद १० नुसार कारवाईची मागणी करावी, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.
0 Comments