शहीद जवानाच्या कुटुंबीयांना त्रास देणारा ग्रामसेवक निलंबित



शहिद जवानाच्या कुटुंबीयांना ग्रामसेवक त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे. त्या ग्रामसेवकाने गावामध्ये ऋषिकेश जोंधळे कुटुंबीयांच्या विरोधात पोस्टर लावले आहे. यातून जोंधळे कुटुंबीयांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जोंधळे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील वीस वर्षीय तरुण ऋषिकेश जोंधळे यांना 13 नोव्हेंबर 2020 रोजी वीर मरण प्राप्त झाले होते. पाकिस्तानी लष्कराशी झुंज देताना त्यांचा मृत्यू झाला होता.

ग्रामसेवकाचे निलंबन मात्र, शहीद जवानाच्या कुटुंबीयांना ग्रामसेवक त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे. त्या ग्रामसेवकाने गावामध्ये जोंधळे यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात पोस्टर लावले आहे. यातून कुटुंबीयांची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप जोंधळे कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे ग्रामसेवकाचा विरोधात जोंधळे कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. जोंधळे कुटुंबीयांच्या जिवाला धोका असून पोलीस संरक्षणाची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकारी संजय सिंग चव्हाण यांनी ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई केली आहे.

कुटुंबियांची पोलीस संरक्षण देण्याची मागणी - कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथे राहणाऱ्या 20 वर्षीय जवान ऋषिकेश जोंधळे यांना पाकिस्तानी लष्कराशी लढतांना विर मरण आले होते. यानंतर शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र, बहिरेवाडी येथील ग्रामसेवक राजेंद्र उर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी याच्याकडून जोधळे यांच्या कुटुंबीयांना त्रास देत असल्याचे म्हटले आहे. तशी तक्रार त्यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना केली आहे. या पत्रात त्यांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. 

Post a Comment

0 Comments