अभिनेत्री पूजा हेगडे हे साऊथ फिल्ममधील एक मोठे नाव आहे. तिने बॉलीवूडमध्ये कित्येक चित्रपटात काम केले आहे. नुकतेच तिने तिच्या सोबत झालेल्या असभ्य वर्तनाबद्दल खुलासा केला आहे. तिने आपल्या ट्वीटरवरून एका खासगी फ्लाइट स्टाफवर आपला राग व्यक्त केला आहे. या ट्वीटमध्ये तिने एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी तिच्याशी असभ्य आणि धमकीच्या सुरात बोलल्याचे म्हटले आहे. अभिनेत्री पूजा हेगडेचे हे ट्वीट सध्या सोशल मीडिवर चांगलेच व्हायरल होत आहे.
अभिनेत्री पूजा हेगडेने (pooja hegde) यासंदर्भातील ट्वीट केल्यानंतर विमान कंपनीला त्यांची माफी मागावी लागली. यानंतर लोकांनी पूजाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे. तिच्या ट्विटमध्ये तिने लिहिले आहे की, 'मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये इंडिगोचा स्टाफ मेंबर विपुल नक्षे याने मला अत्यंत वाईट वागणूक दिल्याचे मला खूप दुःख झाले आहे. कोणत्याही कारणाशिवाय माझ्याशी वाईट पद्धतीने धमकीच्या स्वरात बोलले गेले. मी असे ट्विट कधीच केले नाही, पण ते खरोखरच भयानक होते.
पूजाने तिच्या ट्वीटर अकाउंटवर हा मेसेज लिहिताच त्यावर इंडिगोकडून रिप्लायदेखील आला आहे. इंडिगोने आपल्या ट्वीटरमध्ये म्हटले आहे की, 'मिस हेगडे... आमच्या कर्मचाऱ्याकडून तुम्हाला आलेल्या या वाईट अनुभवाबद्दल आम्ही तुमची माफी मागतो. आम्ही तुमच्याशी त्वरित संपर्क साधतो, कृपया आम्हाला तुमचा संपर्क क्रमांक द्या.
इंडिगोने जरी अभिनेत्री पूजा हेगडे हिची माफी मागितली असली तरी, आता पूजा हेगडेला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल केले जात आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर यावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे... "सर, हे प्रकरण गांभीर्याने घेऊ नका, फक्त या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करा... तुमच्या कर्मचाऱ्यावर कोणतीही कठोर कारवाई करू नका" तर एकाने म्हटले आहे, पूजाने असे ट्विट केले नसावे, त्यामुळे त्या व्यक्तीची नोकरीही जाऊ शकते.
0 Comments